खरात प्रकरणातील अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

खरात प्रकरणातील अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

खरात प्रकरणातील अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

अशा प्रकारांवर कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा  

पुणे, ता. २६ - भोंदू अशोक खरात प्रकरणात लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करणे व पसरवणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांवर कडे पोलिसांचे बारकाईने लक्ष असणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे व याबाबत कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

भोंदू खरातने केलेल्या महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी 

अहिल्यानगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव येथील राहुल शिंदे, योगेश आढाव आणि बीड जिल्ह्यातील संदीप गर्जे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.

या तिन्ही संशयित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके पाठवली आहेत. 

महिलांचे हे व्हिडिओ  संदीप गर्जे यांनी योगेश आढाव यांना पाठवले आणि त्यानंतर योगेश आढाव यांनी आपल्या मित्र राहुल शिंदे यांना ते पाठवले, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या साखळीचा शोध घेत आरोपींना शोधले. या प्रकरणी गुन्हा भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) कलम २९४ (२), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ (अ) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

महिलांचे हे व्हिडीओ सोशल मिडीयावर पसरवणे हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. अशा कृत्यांमुळे पीडित महिलांना मानसिक त्रास होतो आणि समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे असे व्हिडीओ पसरवणाऱ्यांवर यापुढे पोलिसांचे बारीक लक्ष असणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories