खेड तालुक्यात नाणेकरवाडी येथे ३२ हजारांची देशी दारु जप्त; एकावर गुन्हा
पिंपरी, ता. ६ - पाँवर लाईम पंच नावाच्या देशी दारुच्या ३२ हजार रुपयांच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई शुक्रवारी (ता. ५) मौजे नाणेकरवाडी गावच्या हद्दीत नाणेकरवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर (ता. खेड) करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई महेश शत्रुघ्न कोळी (वय २८, नेमणूक चाकण उत्तर पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी राजकुमार राममुरत बिंद (वय २८, रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (५ जून) सायंकाळी ७.३५ वाजता नाणेकरवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी स्कूटीवरुन देशी दारुची अवैध वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार केलेल्या कारवाईत त्याच्याकडे ‘पॉवर लाईम पंच’ नावाच्या देशी दारुच्या बाटल्यांचा साठा आढळून आला. बिगरपरवाना व बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ही दारु आरोपी नेत होता. या ३२ हजार रुपयांच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
आरोपीविरोधात दक्षिण चाकण पोलिस ठाण्यात मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.