'पिंपरी-चिंचवड आरटीओ'कडून पक्क्या लायसन्ससाठी मासिक दौऱ्याचे ऑगस्टमध्ये आयोजन

'पिंपरी-चिंचवड आरटीओ'कडून पक्क्या लायसन्ससाठी मासिक दौऱ्याचे ऑगस्टमध्ये आयोजन

'पिंपरी-चिंचवड आरटीओ'कडून पक्क्या लायसन्ससाठी मासिक दौऱ्याचे ऑगस्टमध्ये आयोजन

पिंपरी, ता. २८ जुलै २०२६ - वाहन चालवण्याचा पक्का परवाना (अनुज्ञप्ती) मिळण्यासाठी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ऑगस्टमध्ये मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.

पक्क्या लायसन्सच्या चाचणीसाठी ३, ४ आणि ५ ऑगस्ट २०२६ रोजी खेड, १०, ११ आणि १२ ऑगस्ट रोजी मंचर, १७, १८ आणि १९ ऑगस्ट रोजी जुन्नर, २४, २५ आणि २७ ऑगस्ट रोजी वडगाव मावळ आणि २८ व ३१ ऑगस्ट २०२६ रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्क्या लायसन्ससाठी ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी ५ वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories