पिंपळे सौदागरमध्ये कुणाल आयकॉन रोडच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाची नगरसेवक व अधिकाऱ्यांकडून पाहणी
Mar 21 2026
38
पिंपळे सौदागरमध्ये कुणाल आयकॉन रोडच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाची नगरसेवक व अधिकाऱ्यांकडून पाहणी
पिंपरी, ता. २१ - पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाची शनिवारी (ता. २१) अधिकाऱ्यांनी व स्थानिक नगरसेवकांनी पाहणी केली. सदर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी वेळेत व दर्जेदारच पूर्ण करणे करावे आणि कामाच्या दरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या पाहणीमध्ये कुणाल आयकॉन, शुभश्री, साई अॅव्हेन्यू अशा वेगवेगळ्या सोसायटींच्या प्रवेशद्वारासमोर पावसाळ्यात पाणी साठते तेथे चेंबर बनवून त्याचे कनेक्शन स्ट्रॉम वॉटरला जोडण्याचे व त्या पाण्याचा सुरळीतरित्या निचरा करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी स्थानिक नगरसेवक नाना काटे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाचे डेप्युटी इंजिनिअर चंद्रकांत मोरे, विद्युत विभागाच्या डेप्युटी इंजिनिअर दिपाली रेडे, विद्युत विभागाचे सल्लागार, स्थापत्य विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर विवेक गजपुरे, पाणीपुरवठा विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर अंकुश सयाजीराव, तसेच इन्फ्राकिंग कन्सल्टन्सी इंजिनियर्स प्रा. लि. चे प्रकल्प सल्लागार आर. ई. राकेश पटेल आणि T@T इन्फ्रा लिमिटेडचे प्रोजेक्ट मॅनेजर युवराज आवारे उपस्थित होते.
यावेळी स्थानिक सोसायट्यांचे चेअरमन, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या सूचना व समस्या समजून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.