बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर कष्टकरी संघर्ष महासंघाचे आंदोलन

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर कष्टकरी संघर्ष महासंघाचे आंदोलन

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर कष्टकरी संघर्ष महासंघाचे आंदोलन 

पिंपरी, ता.  २४ -  बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर न्याय मिळवण्यासाठी मंगळवारी (ता. २३) कष्टकरी संघर्ष महासंघांच्या वतीने पुणे कामगार उपआयुक्त कार्यालयात आंदोलन करण्यात आले. असंख्य बांधकाम कामगार या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

महासंघाचे प्रमुख काशिनाथ नखाते यांनी कामगारांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. श्रमिकांच्या घामाला न्याय आणि सन्मान मिळावा, यासाठीचा हा संघर्ष पुढेही अधिक ताकदीने सुरू राहिल, असे ते म्हणाले. 

कामगारांचे सर्व प्रकारचे अर्ज सेवा हमी कायद्यानुसार त्वरीत निकाली काढावेत, बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक साधने देण्यात यावी, कामगारांच्या वस्तू वाटपामध्ये अफरातफर आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य देणाऱ्या ठेकेदारावर त्वरीत कारवाई करावी या प्रमुख मागण्यांबाबत महासंघाच्या शिष्टमंडळाने कामगार कल्याण अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories