news
clock
पुणे जिल्ह्यातील १५ ते ४५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचे आयोजन

पुणे जिल्ह्यातील १५ ते ४५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचे आयोजन

पुणे जिल्ह्यातील १५ ते ४५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचे आयोजन 

पुणे, ता. २५ - पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) च्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवती व तरुण-तरुणींसाठी रोजगाराच्या दृष्टीने उपयोगी ठरणारा अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. या प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील नवीन बॅच १ एप्रिल २०२६ पासून सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत सदर प्रशिक्षण कार्यक्रम हा  ८ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू केला होता. वय १५ ते ४५ वयोगटातील पात्र उमेदवारांना यासाठी अर्ज करता येईल.  दुसऱ्या टप्प्यात अधिक उमेदवारांना संधी उपलब्ध असेल.  यामध्ये जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमधील उपलब्ध सुविधा, अत्याधुनिक प्रशिक्षण साधनांचा वापर करुन तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. यातून उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक अद्ययावत कौशल्ये उमेदवारांना शिकवली जातील.

 प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. वय १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवती व तरुण-तरुणींना यासाठी अर्ज करता येईल. या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सु, रा. वराडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories