महाराष्ट्र केसरी किताबावर यंदा नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर याची मोहोर
पुणे, ता. २३ - यंदाचा महाराष्ट्र केसरी हा किताब नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर याने पटकावला आहे. चांदीची गदा आणि फॉर्च्युनर मोटार हर्षवर्धनने जिंकली असून तो दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पुण्यातील वाघोलीमध्ये ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा १२ ते २२ मार्च दरम्यान पार पडली. अंतिम लढतीसाठी सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात सामना झाला.
अंतिम लढतीत हर्षवर्धनने महेंद्र गायकवाडचा 4-2 असा पराभव केला. पहिल्या डावात दोघांची 1-1 अशी बरोबरी झाली होती. महाराष्ट्र केसरीच्या किताबासह हर्षवर्धनने मानाच्या गदेसह फॉर्च्युनर कारही जिंकली आहे. ५ लाख रुपयांच्या बक्षिसाचा तो मानकरी ठरला. फॉर्च्युनर मोटार जिंकणारा तो पहिला महाराष्ट्र केसरी ठरला आहे. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड ठरला असून महेंद्र गायकवाड यांस चांदीची गदा आणि स्कॉर्पिओ कार बक्षीस स्वरुपात मिळाली आहे.
महेंद्र गायकवाड याने माती विभागातील अंतिम फेरीत सिकंदर शेखचा पराभव केला. हर्षवर्धन सदगीर याने जय पाटील याचा गादी विभागातील अंतिम फेरीत केला. यामुळं महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड आमने सामने आले. शेवटच्या डावात हर्षवर्धन बाहेर गेल्याने एक गुण महेंद्र गायकवाडला मिळाला. कुस्तीचा वेळ संपला तेव्हा हर्षवर्धन सदगीर याने 4-2 असा विजय मिळवला.
शेवटच्या डावात हर्षवर्धन सदगीर बाहेर गेल्यानं एक गुण महेंद्र गायकवाडला मिळाला. कुस्तीचा वेळ संपला
विजेता हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेता महेंद्र गायकवाड यांचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी अभिनंदन केले आहे.