महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा विजय

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा विजय

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा विजय  

पुणे, ता. २२ - महाराष्ट्र विधान परिषद 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. ठाणे, यवतमाळ, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीने बिनविरोध विजय मिळवला आहे. उर्वरित ११ जागांमध्ये भाजपचे वर्चस्व राहिले आहे. 

भाजपने सर्वाधिक 10 जागा जिंकल्या. शिवसेनेला 3, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी झाले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने ११, शिंदे शिवसेना ४ तर राष्ट्रवादी काँग्रेसने २ जागांवर उमेदवार उभे केले होते. १७ पैकी ११ जागांसाठी १८ जून रोजी मतदान पार पडले.


विजयी उमेदवार -

1. नागपूर - डॉ. राजीव पोतदार (भाजप)

2. धाराशिव-बीड-लातूर- बसवराज पाटील (भाजप)

3. सांगली-सातारा- धैर्यशील कदम (भाजप)

4. जळगाव- नंदकिशोर महाजन (भाजप)

5. छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाठ (भाजप)

6. सोलापूर- राजेंद्र राऊत (भाजप)

7. नांदेड- अमरनाथ राजूरकर (भाजप)

8. भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर (भाजप)

9. परभणी-हिंगोली- सईद खान (शिवसेना)

10. नाशिक- गोकुळ गिते (अपक्ष)

11. अमरावती - प्रवीण पोटे (भाजप)


- बिनविरोध विजेते (६ जागा)

1. पुणे - विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार)

2. अहिल्यानगर - प्राजक्त तनपुरे (भाजप)

3. ठाणे - रवींद्र फाटक (शिंदे शिवसेना)

4. रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग- अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार)

5. यवतमाळ - दुष्यंत चतुर्वेदी (महायुती- शिवसेना)

6. वर्धा - गडचिरोली-चंद्रपूर- अरुण लखाणी (भाजप)



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories