पावसाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे - प्रा. राम शिंदे

पावसाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे - प्रा. राम शिंदे

पावसाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे - प्रा. राम शिंदे

पुणे, ता. १६ - महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत होणार आहे. हे अधिवेशन  सुरळीत, सुरक्षित व नियोजनबद्धरित्या पार पडावे या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कामकाज करावे, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने पूर्वतयारीसंदर्भात विधानभवन येथे आयोजित बैठकीत दिले.

पावसाची शक्यता लक्षात घेता सुरक्षित मंडप, सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात कर्मचाऱ्यांसाठी अन्न पाकिटे, स्वच्छ आणि सुसज्ज उपहारगृह याबाबत अत्यंतिक दक्षता घेण्यात यावी. विधानभवन परिसरात शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात येऊन गर्दी नियंत्रित व्हावी यादृष्टीने सुरक्षा यंत्रणेने नियोजन करावे, त्याचप्रमाणे डिजिटल प्रवेशपास व्यवस्था सुरु करावी, असे निर्देशही सभापती प्रा. शिंदे यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories