श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेकडून व्यापक तयारी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेकडून व्यापक तयारी
पुणे, ता. १६ - आषाढी वारीसाठी पुणे शहरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुणे महानगरपालिकेने सर्वंकष नियोजन सुरू केले आहे. लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि विविध विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ, सुसज्ज व सुखकर अनुभव मिळावा यासाठी पुणे महानगरपालिका कटिबद्ध आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर,स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षनेते सोपान चव्हाण, आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) प्रजीत नायर, सुनील शिंदे, सुहास टिंगरे, हर्षल टिंगरे, शीतल सावंत, संगीता दांगट, अश्विनी भंडारे, नंदिनी धेंडे, रफिक शेख, पल्लवी जावळे, रवींद्र काकडे, दत्ता बहिरट यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विविध विभागांना देण्यात आलेल्या सूचना -
✅ पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्ती व डागडुजी
✅ पावसाळी गटारे, चेंबर्स व नाल्यांची साफसफाई
✅ स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन व २४ तास साफसफाई व्यवस्था
✅ पुरेसा पाणीपुरवठा व पिण्याच्या पाण्याची सुविधा
✅ मोबाईल टॉयलेट्स व सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती
✅ आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा व औषध फवारणी
✅ पालखी मार्गावरील प्रकाश व्यवस्था व विद्युत सुरक्षेची खबरदारी
✅ वाहतूक व्यवस्थापन व अतिक्रमण निर्मूलन
✅ वारकऱ्यांसाठी विसावा केंद्रे, आराम कक्ष व आवश्यक सुविधा
✅ पालखी मुक्कामस्थळी विशेष स्वच्छता व सुविधा