सलून सेवांच्या दरामध्ये २० टक्के वाढ, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय

सलून सेवांच्या दरामध्ये २० टक्के वाढ, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय

 सलून सेवांच्या दरामध्ये २० टक्के वाढ, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय 

पुणे, ता. ६ - राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील केशकर्तन (सलून) सेवांच्या दरामध्ये २० टक्के वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळाने घेतला आहे. ही दरवाढ ६ जून २०२६ पासून लागू करण्यात आली आहे, अशी माहिती नाभिक महामंडळाकडून देण्यात आली आहे. 

या दरवाढीबाबत, नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष सयाजी झुंजार यांनी सांगितले की, गेले काही महिने जगभरात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीमुळे इंधन दरवाढीबरोबर विविध वस्तू व सेवांच्या दरातही वाढ झाली आहे.  सलून व्यवसायासाठी लागणारे शॅम्पू, हेअर कलर, ब्लीच, फेशियल क्रीम, जेल, वॅक्स, डिस्पोजेबल वस्तू, टॉवेल धुण्याचे साहित्य, निर्जंतुकीकरणासाठी लागणारे पदार्थ आणि इतर अनेक वस्तू पेट्रो-केमिकल उद्योगाशी संबंधित आहेत. त्यामुळे इंधन दरवाढीचा थेट परिणाम या वस्तूंवर झाला आहे. लॉरियल, वेला, श्वार्झकॉफ, गोदरेज यांसारख्या नामांकित देशी-विदेशी कंपन्यांनी गेल्या काही काळात त्यांच्या उत्पादनांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. आता, जुने दरच कायम ठेवून सलून व्यवसाय चालवणे अशक्य झाले आहे. दरवाढीचा निर्णय राज्यातील हजारो सलून व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबांच्या जगण्याशी संबंधित आहे. त्यामुळे सलून सेवांच्या दरात वाढ करण्यात आली आहे.  

 वाढत्या महागाईमध्ये सलून व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी आणि दुकानदारांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी दरांमध्ये ही 20 टक्के वाढ करणे अपरिहार्य (Compulsory) होते. ग्राहकांनी या परिस्थितीचा विचार करून सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे.








Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories