अवैध दारु विक्री अड्ड्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस आधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

अवैध दारु विक्री अड्ड्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस आधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

अवैध दारु विक्री अड्ड्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस आधिकाऱ्यांची संयुक्त बैठक 

पिंपरी, ता. ६ -  पिंपरी चिंचवड, पुणे शहर व पुणे ग्रामीण या परिसरातील अवैध दारु विक्री अड्ड्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. ५) पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात समन्वय बैठक घेण्यात आली. 

सदर बैठकीमध्ये भेसळयुक्त दारु, अवैध दारु गाळणे आणि अवैध दारु विक्रीच्या जाळयांविरुध्द गुप्त माहितीची देवाण घेवाण आणि समन्वित अमंलबजावणी अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा करण्यात आली. 

सदर बैठकीला पोलिस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त  सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त  बसवराज तेली (प्रादेशिक विभाग), पोलिस अधिक्षक, (पुणे ग्रामीण) संदिप सिंह गिल, राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणेचे अधीक्षक अतुल कानडे, अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे चे सह आयुक्त गिरीष हुकरे,  पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर पोलिस उपायुक्त चिलूमुल्ला रजनीकांत आणि पिंपरी-चिंचवड पोलिस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार उपस्थित होते. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories