विधानपरिषद निवडणूकीसाठी महायुतीच्या अधिकृत १७ उमेदवारांची यादी जाहीर
पुणे, ता. ३ - विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी महायुतीने आपल्या १७ अधिकृत उमेदवारांची यादी बुधवारी (ता. ३) जाहीर केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सुनील तटकरे आणि राहुल शेवाळे उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जागावाटप पूर्ण करण्यात आले आहे. चार जूनपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि अन्य स्थानिक लोकप्रतिनिधी मतदान करतात. या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मताला विशेष महत्त्व असल्याने मतदारांनी अधिकृत महायुती उमेदवारांनाच पहिल्या पसंतीचे मत द्यावे. काही ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन अर्ज मागे घ्यावेत. बंडखोर कार्यकर्त्यांबाबत भविष्यात महामंडळे व विविध समित्यांमध्ये सकारात्मक विचार केला जाईल. या निवडणुकीत महायुतीचे सर्व १७ उमेदवार विजयी होतील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी सुनील तटकरे आणि राहुल शेवाळे उपस्थित होते.
महायुतीचे जाहीर उमेदवार -
* 'नागपूर - डॉ. राजीव भास्करराव पोतदार
* भंडारा-गोंदिया - अविनाश आनंदराव ब्राह्मणकर
* वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली- अरुण हनुमंत लखानी
* अमरावती - प्रवीण रामचंद्र पोटे
* सोलापूर - राजेंद्र विठ्ठल राऊत
* अहमदनगर (अहिल्यानगर) – प्राजक्त प्रसादराव तनपुरे
* जळगाव - नंदकिशोर भागवत महाजन
* सांगली-सातारा - धैर्यशील ज्ञानदेव कदम
* नांदेड - अमरनाथ अनंतराव राजुरकर
* धाराशिव (उस्मानाबाद)-लातूर-बीड- बसवराज माधवराव पाटील
* छत्रपती संभाजीनगर-जालना सुहास त्र्यंबकराव शिरसाट
* ठाणे - रवींद्र सदानंद फाटक
* यवतमाळ - दुष्यंत सतीश चतुर्वेदी
* परभणी-हिंगोली - सय्यद शेरगुल खान
* नाशिक - नरेंद्र बेकाजी दराडे -
* रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग अनिकेत सुनील तटकरे
* पुणे - विक्रम संजय काकडे