जमीन व्यवहाराच्या वादातून दगडाने हल्ला, एकाला अटक

जमीन व्यवहाराच्या वादातून दगडाने हल्ला, एकाला अटक

जमीन व्यवहाराच्या वादातून दगडाने हल्ला, एकाला अटक

पिंपरी, ता. ३० - जमीन खरेदी-विक्रीच्या एजन्सीच्या वादातून दोघांवर दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी (ता. २८) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भुगाव रोडवरील जिजाई कॅफेजवळील मोकळ्या जागेत घडली.

 फिर्यादी विजय किसन जोरी (वय ३९, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड) व त्यांचे सासरे अनिल हिरामण लवार्डे यांच्याशी पूर्वी झालेला वाद तसेच जमीन खरेदी-विक्रीच्या एजन्सीच्या कारणावरून आरोपी सुनील ऊर्फ बंडू विष्णू जोरी (रा. वारजे, पुणे) याने शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर दोघांच्या डोक्यात दगडाने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

 या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(२), ११५(२), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सुनील ऊर्फ बंडू विष्णू जोरी याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास बावधन पोलिस करीत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories