मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश

पिंपरी, ता. ३१ जुलै २०२६ - मराठा आरक्षण कक्षाचे कामकाज अधिक गतिमान व प्रभावी करण्यासाठी पुढील सात दिवसांमध्ये आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरून हा कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश मंत्री तथा मराठाआरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींच्या अंमलबजावणीची आढावा बैठक २९ जुलैला मंत्रालयात पार पडली. बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीत मराठा समाजाशी संबंधित प्रलंबित विषय आणि शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधांबाबतचा आढावा घेऊन अंमलबजावणी बाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या ५ जून २०२६ च्या शासन निर्णयाची सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी विनाविलंब व तात्काळ अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रलंबित असलेल्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रांच्या सर्व प्रकरणांचा निपटारा तातडीने व प्राधान्यक्रमाने करावा.

तालुकास्तरीय वंशावळ समितीस मुदतवाढ देण्याबाबतचे आदेश तात्काळ निर्गमित करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाला बैठकीत देण्यात आले.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories