मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापतिपदासाठी बुधवारी निवडणूक

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापतिपदासाठी बुधवारी निवडणूक

 मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापतिपदासाठी बुधवारी निवडणूक

पिंपरी, ता. २४ - मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी येत्या बुधवारी (ता. २५) निवडणूक होणार आहे. सर्व इच्छुकांना समान संधी मिळावी या हेतूने 'लॉटरी' पद्धतीने पदांची निवड होणार आहे. 

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उर्वरित २४ महिन्यांच्या कार्यकाळात सभापतिपदासाठी ९ तर उपसभापतिपदासाठी ४ इच्छुक आहेत. इच्छुकांमध्ये 'पहिले कोण' या मुद्द्यावर वाद टाळण्यासाठी सर्वांच्या नावांच्या चिठ्ठया काढून लॉटरी पद्धतीने निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्व १३ इच्छुकांनी संमती दिल्याने निवडणूक बिनविरोध होईल असे चित्र आहे.

 मर्यादित कालावधीत सर्वांना संधी देण्यासाठी कालावधी विभागून देण्यात येणार आहे. यापूर्वी ठरलेल्या करारानुसार पदांमध्ये बदल अपेक्षित असतानाही विद्यमान पदाधिकाऱ्यांनी तीन वर्षे कार्यभार सांभाळल्याने उर्वरित संचालकांना संधी मिळाली नव्हती. नुकतेच सभापती संभाजी शिंदे व उपसभापती नामदेव शेलार यांनी राजीनामे दिल्यानंतर ही पदे रिक्त झाली आहेत. सर्व इच्छुकांना समान संधी मिळावी या हेतूने 'लॉटरी' पद्धतीने सभापती व उपसभापतिपदासाठी निवड होणार आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories