news
clock
दुग्धव्यवसाय अभ्यास दौऱ्यासाठी मावळचे शेतकरी गुजरातला रवाना

दुग्धव्यवसाय अभ्यास दौऱ्यासाठी मावळचे शेतकरी गुजरातला रवाना

दुग्धव्यवसाय अभ्यास दौऱ्यासाठी मावळचे शेतकरी गुजरातला रवाना

पिंपरी, ता. २३ - मावळ तालुका कृषी विभाग व  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने पवन मावळातून  दुग्धव्यवसाय व प्रक्रिया उद्योग अभ्यास दौऱ्यासाठी २० शेतकरी गुजरातला रवाना झाले आहेत. उर्से येथील श्री पद्मावती माता मंदिरात नारळ वाढवून या अभ्यास दौऱ्याला सुरुवात झाली.

राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळ गुजरात येथे सन २०२५-२६ अंतर्गत 'दुग्धव्यवसाय व प्रक्रिया उद्योग' या विषयावरील पाच दिवसीय आंतरराज्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मावळ, मुळशी, वेल्हा व भोर तालुक्यातील एकूण ४५ शेतकरी रवाना झाले. त्यात प्रकल्प संचालक सूरज मडके, रोहित क्षीरसागर, मारुती साळे यांचे मार्गदर्शनाखाली राहुल घोगरे, प्रमिला भोसले यांनी नियोजन केले आहे.

 या वेळी सहायक कृषी अधिकारी प्रमिला भोसले यांनी मार्गदर्शन केले. सुभाष धामणकर यांनी आभार मानले. यावेळी विकास शेलार, धनंजय टिळे, जालिंदर धामणकर, राजाभाऊ असवले, संतोष येवले, दत्तात्रय दौंड, रमेश कारके, शांताराम दरेकर, संतोष काळे शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories