'एमआयडीसी'द्वारे जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्ती कामांमुळे उद्या शहराच्या काही भांगातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी, ता. ३ - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विद्युत व यांत्रिकी उपविभागामार्फत जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (ता. ४) दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती एमआयडीसी प्रशासनाने दिली. 

पाणीपुरवठा बंद राहणार असलेले परिसर - पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमई, आर. अँड डी. दिघी, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड (ओएफडीआर) परिसर हे आहेत. 

 शुक्रवारी (ता. ५) आणि शनिवारी (ता. ६) संबंधित भागांमध्ये कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा व पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories