news
clock
पिंपरी-चिंचवडमधील विविध प्रकल्प वेळेत व गुणवत्तेने पू्र्ण करावेत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश

पिंपरी-चिंचवडमधील विविध प्रकल्प वेळेत व गुणवत्तेने पू्र्ण करावेत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश

पिंपरी-चिंचवडमधील विविध प्रकल्प वेळेत व गुणवत्तेने पू्र्ण करावेत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश 

पिंपरी, ता. २८ - पिंपरी-चिंचवडमधील सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करुन नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर परिवहन महामंडळ यांनी आपसांत समन्वय ठेवून शहरातील विकास कामांचा वेग वाढवावा. पारदर्शकपणे व गुणवत्तेने शहरातील सर्व प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. २७) झालेल्या बैठकीत शहरातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पाणीटंचाईपासून ते स्वच्छता, गृहनिर्माण, नदी पुनरुज्जीवन, कचरा व्यवस्थापन, मेट्रो सेवा आणि रस्ते विकास या प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर ठोस व सकारात्मक चर्चा करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते माधुरी मिसाळ यांचे स्वागत करण्यात आले. या बैठकीला आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे,  सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीच्या सुरुवातीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरणातून शहरात सुरु असलेले पाणी पुरवठा प्रकल्प, अमृत योजना २. ०, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, रस्ते विकास प्रकल्प, शहरातील ड्रेनेज व पायाभूत सुविधा सुधार प्रकल्प, मेट्रो वाहतूक प्रकल्प, रस्ते विकास प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजना, हुतात्मा क्रांतिवीर चापेकर वाडा, अग्निशमन केंद्र, नोकरदार महिला वसतिगृह, संतपीठ प्रकल्प, मनोरंजन प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता तसेच विविध नागरी प्रकल्पाची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना दिली.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रत्येक प्रकल्पाची सध्यस्थिती, कामांचा प्रगतीदर, निधीचे वितरण, कामातील तांत्रिक अडचणी आणि त्यावरील उपाययोजना यांचा सखोल आढावा घेतला. शहरातील वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण प्रकल्प आणि मनोरंजन प्रकल्पांच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास साधण्यावरही मार्गदर्शन करून सार्वजनिक ठिकाणे, उद्याने आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा अधिक दर्जेदार करण्यासाठी कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांचा आढावा घेताना लाभार्थ्यांना वेळेत घरे उपलब्ध करून देण्याबाबत काटेकोर नियोजन करावे तसेच रस्ते विकास आणि वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा करून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 या बैठकीचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. आभार महापौर रवी लांडगे यांनी मानले.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories