news
clock
दोन आरोपींकडून ३७ लाखांचा गांजा जप्त, आरोपी अटकेत, सांगवी पोलिसांची कामगिरी

दोन आरोपींकडून ३७ लाखांचा गांजा जप्त, आरोपी अटकेत, सांगवी पोलिसांची कामगिरी

दोन आरोपींकडून ३७ लाखांचा गांजा जप्त, आरोपी अटकेत, सांगवी पोलिसांची कामगिरी

पिंपरी, ता. २८ - सांगवी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीला सांगवी पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडे ७ लाखांचा गांजा सापडला आणि त्याचा साथीदार असलेल्या दौंड तालुक्यातील दुसऱ्या आरोपीकडे ३७ लाखांचा गांजा सापडला. दोन्ही आरोपींकडून ३७ लाख ९ हजार रुपये किंमतीचा एकूण ७४.१८ किलो ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. 

दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री सांगवी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना सांगवी परिसरात एक काळ्या रंगाच्या शाईन मोटारसायकलवर एक इसम निर्जन स्थळी संशयास्पदरित्या आढळला. त्याना गाडीवर पांढऱ्या रंगाचे पोते बांधलेले होते. त्याला तिथे थांबण्याचे कारण विचारले असता तो पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी लागलीच त्याचा पाठलाग करुन शिताफीने त्याला पकडले.  त्याच्या गाडीला लावलेले पांढऱ्या रंगाच्या पोत्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात ७,००,०००/- रुपये किमतीचा १४ किलो गांजा हा सापडला. गांजासह एक मोटार सायकल त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. त्याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात  एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब), २९ अन्वये गुन्हा दाखल आहे. गणेश कैलास चव्हाण (वय ३० वर्षे, रा. ता. शिरुर) असे अटक आरोपीचे नाव आहे. 

तपासात आरोपी गणेशने त्याचा साथीदार आरोपी विनोद ज्ञानेश्वर झरे याचा साथीने आधी आणलेला गांजा विनोद याच्या राहत्या घराच्या  परिसरामधे साठवून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार  सांगवी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने आरोपी विनोद याच्या दौंड तालुक्यातील पाटेठाण गावी जाऊन त्याच्या घराच्या आजूबाजूची झडती घेतली. तेव्हा आरोपीने म्हशीच्या गोठ्यामध्ये साठवून ठेवलेला ६०.१८ किलो ग्रॅम रुपये ३० लाख ९ हजार किंमतीचा गांजा दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामधे एकूण रुपये ३७,०९,०००/- चा गांजा ७४.१८ किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories