महाराष्ट्रात मंत्र्यांच्या हवाई प्रवासावर निर्बंध, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
महाराष्ट्रात मंत्र्यांच्या हवाई प्रवासावर निर्बंध, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
पुणे, ता. १२ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियंना आवाहन केले आहे की, अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धामुळे भारतावर आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचे पेट्रोल आणि डिझेलची बचत करा तसेच वर्षभर सोन्याची खरेदी करु नका. त्यानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या हवाई प्रवासावर निर्बंध लादले आहेत. आता मंत्र्यांना हवाई प्रवास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. याबाबतचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
केवळ अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनेच हवाई प्रवास करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जारी केलेले हे निर्देश केवळ तात्पुरते नाहीत तर, भविष्यातील आर्थिक धक्के टाळण्यासाठी एक खबरदारीचा उपाय आहे. मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः काटकसर केली, तर जनताही त्यांचे अनुकरण करेल, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
- आर्थिक संकट, economic crisis, पेट्रोल बचत, petrol saving, डिझेल बचत, diesel saving,
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, PM Narendra Modi, अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्ध, US-Israel-Iran war,
- , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, CM Devendra Fadnavis, महाराष्ट्र, Maharashtra,
- निर्बंध, restrictions
- मंत्र्यांचे हवाई प्रवास, ministers air trave