जिवंत काडतूसासह पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात
Apr 29 2026
61
जिवंत काडतूसासह पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी, ता. २९ - बेकायदेशीररित्या ५१ हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काडतूसासह बाळगणाऱ्या अलपवयीन गुन्हेगाराला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सोमवारी (ता. २७) कुदळेवस्ती-मोशी येथून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुदळेवस्ती-मोशी येथील पाण्याच्या टाकीजवळ हा अल्पवयीन गुन्हेगार पिस्तूलासह सापडला. पोलिसांनी पिस्तूल व काडतूस जप्त करुन त्याला ताब्यात घेतले. घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेशाचे उल्लंघन करुन त्याने विनापरवाना, बेकायदेशीरपणे ५१ हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काडतूसासह बाळगले होते.
सध्या हा अल्पवयीन गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २८) भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४९ चे कलम ३७(१) (३), १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.