news
clock
वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा

वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा

 वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा 

पिंपरी, ता. २९ - तळेगाव दाभाडे परिसरात वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात मंगळवारी (ता. २८) गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.  

ही महिला मंगळवारी तळेगाव दाभाडे येथील जुन्या पुणे-मुबंई महामार्गावर वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने वावरत होती. ती येणाजाणाऱ्यांना लैंगिक हावभाव करत होती व बोलतही होती. तिच्या या वर्तणूकीमुळे सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग होत होता. 

या महिला आरोपीवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात अनैतिक व्यावारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला अटक करण्यात आली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories