पावसाळ्यात वाहन चालवताना खबरदारी घ्या, अपघात टाळा, आरटीओ कार्यालयाचे आवाहन
पिंपरी, ता. २५ - सध्या पावसाळा सुरु झाला आहे. पावसामध्ये रस्ते ओले व निसरडे होणे, खड्डे पडणे, दृश्यमानता कमी यामुळे रस्त्यांवर अपघात होतात. त्यामुळे पावसाळ्यात वाहन चालवताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने वाहन चालकांना केले आहे.
आरटीओ'ने सांगितले आहे की, पावसात चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण अधिक असते. पावसात वाहन घेऊन बाहेर पडताना विंडशील्ड वायपर्स, हेडलाइट, टेललाइट्स, ब्रेक्स यांची तपासणी करा. पावसाळ्यात वाहन नेहमी हळू चालवावे. नदी पुलावरून पाणी वाहत असेल तर वाहने घेऊन जाऊ नका. पावसाळ्यात दृश्यमानता कमी असल्यामुळे हेडलाइट्स सुरू ठेवावेत. त्यामुळे अपघात टाळता येतील.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव म्हणाले की, ''पावसाळ्यात दृश्यमानता कमी आणि रस्ते निसरडे झाल्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वाहन चालकांनी विशेषतः दुचाकी वाहन चालकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.''
- पावसात अपघात टाळण्यासाठी आरटीओकडून सूचना -
- हवामान आणि सुरक्षिततेची माहिती आधी तपासून घ्या
- शक्य असल्यास पावसाळ्यात वाहन चालविणे टाळा
- वाहनांची नियमित देखभाल दुरुस्ती करा
- बाहेर पडताना वाहन दोन वेळा तपासा
- चाकांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक
- पावसात हेडलाइट्स आणि इंडिकेटर्स सुरू ठेवा
- दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा
- डोंगर माथ्यावर वाहन थांबविणे टाळा
- साचलेल्या आणि वाहत्या पाण्यात गाडी नेणे टाळा
- वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा
- गाडीत जॅक, पाना आणि पंक्चर काढण्याचे साहित्य किंवा रिपेअर जेल असू द्या
- वाहन देखभाल, Vehicle Maintenance, रस्ते सुरक्षा, Road Safety, निसरडे रस्ते, Slippery Roads, कमी दृश्यमानता, Low Visibility Driving, हेडलाइट वापर, Headlight Usage
- सुरक्षित वाहन चालवणे, Safe Driving, दुचाकी सुरक्षा, Two Wheeler Safety, हेल्मेट वापर, Helmet Safety
- पिंपरी चिंचवड आरटीओ, Pimpri Chinchwad RTO, पावसातील अपघात प्रतिबंध, Rainy Season Accident Prevention
- पावसाळी वाहन सुरक्षा, Monsoon Driving Safety, आरटीओ आवाहन, RTO Advisory