news
clock
मोशीतील सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलचे काही वर्ग नवीन इमारतीत सुरु होणार

मोशीतील सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलचे काही वर्ग नवीन इमारतीत सुरु होणार

मोशीतील सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलचे काही वर्ग नवीन इमारतीत सुरु होणार  

आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद

पिंपरी, ता. २५ - मोशी येथे शिवाजीवाडी- डुडुळगाव परिसरातील महापालिकेच्या सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वर्गखोल्यांचा प्रश्न अखेर सुटला असून, तब्बल ४७० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हक्काच्या वर्गखोल्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या ठिकाणी महापालिकेकडू शैक्षणिक संकुलाचे काम सुरु आहे. त्यामधील एका भागात ही शाळा सुरु होईल.

या शाळेसाठी २०१७ पासून महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र, सन २०२० ते २०२३ या कालावधीत वर्गखोल्यांच्या अभावामुळे एकाही विद्यार्थ्याला प्रवेश देता आला नव्हता. सध्या सुमारे १२५० विद्यार्थी वर्गखोल्यांच्या कमतरतेमुळे प्रवेशापासून वंचित होते. ज्या ठिकाणी एका वर्गात ४० मुले आणि ४० मुली असा प्रवेश दिला जातो, त्या ठिकाणी वर्गखोल्या नसल्यामुळे केवळ २०-२० विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्यावा लागत होता.

या गंभीर समस्येकडे भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी लक्ष वेधून सातत्याने पाठपुरावा केला.  भूमि जिंदगी विभागाकडून शाळेसाठी आवश्यक वर्गखोल्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्या शिक्षण विभागाला हस्तांतरित केल्या आहेत. महापालिका प्रशासनाकडून या ठिकाणी एका शैक्षणिक संकुलाचे काम सुरु आहे. त्यामधील एका भागात ही शाळा सुरु होईल. त्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

मोशीतील श्री नागेश्वर मंदिराजवळ असलेल्या या शाळेत सीनियर केजी ते इयत्ता नववीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. नवीन वर्गखोल्या उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मिळाल्या असून पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. 

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे.....

“मोशी परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हीच आमची प्राथमिकता आहे. सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलमधील वर्गखोल्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महापालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. पुढील काळातही परिसरातील शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

– महेश लांडगे, आमदार

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories