शहरातील पाणी पुरवठ्याचा खासदार बारणे यांनी घेतला आढावा

शहरातील पाणी पुरवठ्याचा खासदार बारणे यांनी घेतला आढावा

 शहरातील पाणी पुरवठ्याचा खासदार बारणे यांनी घेतला आढावा 

पिंपरी, ता. ३० - मान्सून लांबल्यामुळे शहरात पाणी कपात करण्यात आली आहे. पाणी पुरवठा फारच विस्कळीत झाल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे, खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (ता. २९) महापालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. शहरातील पाणी पुरवठ्याचा आढावा घेतला. 

पिंपरी-चिंचवडमध्ये टँकरने मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर चालक हे पाणी कोठून आणतात, ते पाणी पिण्यायोग्य आहे का याची चौकशी करावी, पैसे जास्त घेऊन सोसायटीतील नागरिकांवर आर्थिक भुर्दंड टाकला जातो, सोसायटीधारकांची लूट थांबवावी. त्यासाठी टँकर चालकांवर निर्बंध आणावेत. त्यांची नोंद ठेवावी. स्वच्छ पाणी न दिल्यास टैंकर चालकांवर कारवाई करण्याची सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. 

शहरातील ४९४ सोसायट्यांपैकी ३६९ सोसायट्यांमधील एसटीपी चालू आहेत. १२५ सोसायट्यांमधील एसटीपी बंद आहेत. सोसायट्यांमधील एसटीपी चालू आहेत की नाही यावर निगराणी ठेवावी. एसटीपीतील पाणी वाहने धुणे, उद्यानासाठी वापरण्याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे बारणे यांनी सांगितले. 

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश बरिदे, विजयसिंह भोसले, सुनील अहिरे, कनिष्ठ अभियंता अनिश ओक, शिवसेना विश्वजीत गटनेते बारणे, नगरसेविका सुलभा उबाळे, ऐश्वर्या तरस, नगरसेवक नीलेश तरस, राजेंद्र तरस उपस्थित होते.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories