गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या महिलेला बावधनमध्ये अटक

गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या महिलेला बावधनमध्ये अटक

गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या महिलेला बावधनमध्ये अटक 

पिंपरी, ता. ३० - बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या महिलेला जाधववस्ती-बावधन येथून पोलिसांनी सोमवारी (ता. २९) अटक केली आहे. तिच्याकडून १७ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. 

याबाबत बावधन पोलिस ठाण्याचे हवालदार अरुण नरळे यांनी फिर्याद नोंदवली आहे. सोमवारी जाधववस्ती-बावधन परिसरात आरोपी महिला ३४० ग्रॅम वजनाच्या गांजासहित आढळली. तिने विक्रीसाठी बाळगलेल्या या गांजाची किमंत १७ हजार रुपये होती. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.

 तिच्याविरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात  एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (त्त्) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories