सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग महोत्सवाला उद्योजकांचा भरघोस प्रतिसाद
पिंपरी, ता. ३० - निगडी येथील आयसीएआय (The Institute of Chartered Accountants of India) पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आणि ब्ल्यूमार्क सॉफ्टवेअरच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग महोत्सवाला (MSME - Micro, Small, and Medium Enterprises)उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी ब्ल्यूमार्क सॉफ्टवेअरचे संचालक संजय लांडगे,आयसीएआय पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष सीए महावीर अशोकलाल कोठारी, माजी अध्यक्ष सुहास गार्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. सीए महेश्वर मराठे, पंकज दारा, ब्ल्यूमार्क सॉफ्टवेअरचे संजय लांडगे यांनी मार्गदर्शन केले.
लांडगे म्हणाले, ''डिजिटल युगात व्यवसाय वृद्धीसाठी केवळ उत्तम उत्पादनच नव्हे, तर प्रभावी नेटवर्किंगचीही मोठी गरज आहे. ही गरज ओळखून 'ब्लूमार्क सॉफ्टवेअर'ने विकसित केलेले 'एक्स्पान्स' (Ekspans) हे बी-टू-बी नेटवर्किंग अॅप एमएसएमई (MSME)उद्योजकांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. उत्पादक, सेवा पुरवठादार आणि व्यावसायिक यांना एकाच डिजिटल व्यासपीठावर आणणाऱ्या या अॅपद्वारे व्यवसाय विस्तार, नवीन संपर्क आणि ग्राहक शोधणे सुलभ झाले आहे.''
या व्यासपीठावर व्यवसायाचे स्वरुप, थेट प्रचार, लीड जनरेशन आणि विश्लेषणासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. सध्या २० हजारांहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते याचा लाभ घेत आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 9766120836 यावर संपर्क करावा, असे अवाहन करण्यात आहे. अध्यक्ष कोठारी यांनी प्रास्ताविक केले.