नसरापूर येथील बालिकेवर अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने सुनावली 'फाशीची शिक्षा'

नसरापूर येथील बालिकेवर अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने सुनावली 'फाशीची शिक्षा'

 नसरापूर येथील बालिकेवर अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने सुनावली 'फाशीची शिक्षा'

पुणे, ता. २९ -  संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आज (ता. २९ जून) फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी निकाल दिला.  दोन महिन्यांत हा खटला निकाली निघाला आहे. 

गुरुवारी (ता. २५ जूनला) आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयाने दोषी ठरविले. सरकार पक्षाने हा गुन्हा 'दुर्मिळातील दुर्मिळ' स्वरुपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे, आरोपी कांबळे याला मृत्युदंड की जन्मठेप भोगावी लागणार, हे २९ जूनला स्पष्ट होणार होते. त्यानुसार, आज २९ जूला न्यायालयाने आरोपी कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली आहे.  

दिनांक १ मे रोजी नसरापूरामध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर, राज्यभरातून आरोपीबद्दल तीव्र संताप व्यक्त झाला होता. आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी तमाम जनतेने केली होती. पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली होती.  पोलिसांनी अल्पावधीत दोषारोपपत्र दाखल करून खटल्याची सुनावणी सुरू केली होती. आज अंतिम निकाल देताना न्यायालयाच्या आवारात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पीडित चिमुरडीच्या कुटुंबीयांना कोर्ट रूममध्ये बसण्याची विशेष परवानगी देण्यात आली होती. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी निकाल दिला. एकूण १३७ पानांचा हा निकाल आहे. 


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

किवर्ड्स विथ कॉमा मराठी इंग्लिश एकत्र 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories