राष्ट्रीय सामाजिक न्याय दिनानिमित्त पुण्यात समता दिंडीचे आयोजन, नागरिकांना सहभागी होण्याचे समाजकल्याण विभागाचे आवाहन

पुणे, ता. २४ -  लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात 'राष्ट्रीय सामाजिक न्याय दिन' साजरा करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सकाळी ८.३० वाजता संविधान जनजागृती प्रभातफेरी व समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

ही समता दिंडी राजीव गांधी अॅकेडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, पर्वती पायथा येथून सुरू होऊन श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती पायथा, पुणे येथे समाप्त होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन नगरविकास मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते होणार असून समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आयोजित या समता दिंडीत शासकीय-निमशासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी नागरिक, विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक, युवक मंडळे व बचत गटांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, पुणे विशाल लोंढे यांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories