निगडी–चाकण मेट्रोसाठी सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार
पिंपरी, ता. २८ - भोसरीगाव मार्गे जाणाऱ्या निगडी–चाकण मेट्रोसाठी सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे. डीपीआर मंजुरीनंतर हा प्रकल्प ५ वर्षांत पूर्ण होईल, असा विश्वास लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
लांडगे यांनी सांगितले की, सुधारीत प्रकल्प अहवालानुसार मेट्रो आता नाशिक फाटा–भोसरीगाव मार्गे चाकणपर्यंत जाणार आहे, भोसरी-MIDC-लांडेवाडी भागांना थेट जोडणी केली जाणार आहे, मेट्रो स्थानकांजवळ पार्किंग सुविधा असणार आहे, भोसरी डिस्ट्रीक्ट सेंटर येथे डेपो उभारला जाणार आहे. या बदलांसाठी भोसरीतील उड्डाणपूल पाडावा लागणार आहे. वाढती लोकसंख्या, उद्योग आणि ट्रॅफिक लक्षात घेता हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मंजुरीनंतर ५ वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी पुढाकर घेतला आहे.
निगडी–चाकण मेट्रो प्रकल्प थोडक्यात माहिती -
🔹 एकूण लांबी: ४५.२ किमी
🔹 स्थानके: ३४ (पूर्वी ३१)
🔹 खर्च: ₹१२,९३७ कोटी
🔹 दररोज क्षमता: ३.३२ लाख प्रवासी
- मेट्रो स्थानके, Metro Stations, पार्किंग सुविधा, Parking Facilities, डेपो, Metro Depot,
- भोसरीगाव, Bhosari, नाशिक फाटा, Nashik Phata, चाकण, Chakan, भोसरी MIDC, Bhosari MIDC, लांडेवाडी, Landewadi,
- mla महेश लांडगे, Mahesh Landge,
- डीपीआर, Detailed Project Report DPR,
- मेट्रो प्रकल्प, Metro Project,
- निगडी–चाकण मेट्रो, Nigdi Chakan Metro,