शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस नफ्याचे आमिष दाखवून पिंपळे सौदागर येथील इसमाची तब्बल ४ कोटी ४३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक

शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस नफ्याचे आमिष दाखवून पिंपळे सौदागर येथील इसमाची तब्बल ४ कोटी ४३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक

शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस नफ्याचे आमिष दाखवून पिंपळे सौदागर येथील इसमाची तब्बल ४ कोटी ४३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक 

पिंपरी, ता. ६ - ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस नफ्याच्या आमिषाला बळी पडल्याने पिंपळ सौदागर येथील एका इसमाची तब्बल ४ कोटी ४३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. ७ मे २०२६ ते १ जून २०२६ या कालावधीत ही फसवणूक झाली आहे. याबाबत आरोपींवर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी शुक्रवारी (ता. ५) गुन्हा दाखल केला आहे. 

या फसवणूकीबाबत संबंधित इसमाने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मायरा शर्मा नामक महिला, काही बॅंक खाते धारक व काही लिंक धारक आरोपी आहेत.

७ मे २०२६ ते १ जून २०२६ या कालावधीत फिर्यादी इसमाला आरोपी मायरा शर्मा (व्हाट्सअॅप ग्रुप अॅडमीन) यांनी त्यांच्या व्हॉट्सपअवरुन काही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करुन घेतले. (व्हॉट्सअप ग्रुपची नावे - 663 HSBC weaath creation group, 668 internal VIP Strategy Team)

आम्ही सांगितल्याप्रमाणे शेअर ट्रेडींग केल्यास १००० टक्के पेक्षा जास्त फायदा देण्याचे आमीष दाखवले आणि काही लिंक्सद्वारे वेगवेगळ्या शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली वेगवेगळ्या बँकामध्ये फिर्यादी इसमाला एकूण ४ कोटी ४३ लाख २५ हजार रुपये पैसे भरण्यास भाग पाडले. त्यानंतर अॅप्लीकेशनवर  २६ कोटी ६४ लाख ४६ हजार २३७/- रुपये खोटा नफा दाखवला आणि हा नफा काढण्यासाठी एकूण १ कोटी ७ लाख ३७ हजार ८८५/- रुपये शुल्क भरावे लागेल असे सांगितले. यावेळी फिर्यादी इसमाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्याने पोलिसांत तक्रार दिली. 

आरोपींवर सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८ (४), ३ (५) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories