फेसबुकवर पेन्शन कार्डबाबत खोटी माहिती देऊन पिंपरीतील ज्येष्ठ नागरिकाची ९ लाखांची फसवणूक
फेसबुकवर पेन्शन कार्डबाबत खोटी माहिती देऊन पिंपरीतील ज्येष्ठ नागरिकाची ९ लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. ६ - सिनिअर सिटीझन पेन्शन कार्डबाबतच्या फेसबुक अकाउंटवर आलेल्या माहितीवर विश्वास ठेवल्याने उद्यमनगर-पिंपरी येथील एका जेष्ठ नागरीकाला ९लाख १६ हजार ९०० रुपये गमवावे लागले आहेत. हा प्रकार ४ जून रोजी घडला आहे.
संबंधित इसमाने तक्रार दिल्यानंतर संत तुकारामनगर पोलिसांनी शुक्रवारी (ता. ५) अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ४ जूनला दुपारी ०३.३० ते रात्री ८.१० यावेळेत आरोपीने फिर्यादी इसमाच्या फेसबुक अकाऊंटवर सिनियर सिटीझन्स पेंशन कार्डबाबत खोटी माहिती दिली. ही माहिती खरी वाटल्याने फिर्यादी इसमाने प्रतिसाद द्यायला सुरवात केली. आरोपीने त्याचा विश्वास संपादन करुन त्यांचे दोन बॅंक खातेक्रमांक मिळवले आणि परस्पर ९,१६,९००/- रुपये काढून घेऊन ज्येष्ठ नागरीकाला लुबाडले.
या घटनेतील अनोळखी आरोपीचा तपास आता सुरु आहे. आरोपीवर संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३१८ (४), आय.टी. अॅक्ट कायदा कलम ६६ (सी), ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.