पवना धरण ९९ टक्के भरले, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे
पिंपरी, ता. ३१ जुलै २०२६ - पवना धरण ३१ जुलै दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ९८ टक्के भरले, त्यानंतर सव्वा चारच्या सुमारास ९९ टक्के भरले आहे. धरणातून आवश्यकतेनुसार कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होऊ शकतो.
नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहून नदीपात्रातील साहित्य, शेती अवजारे, कृषी पंप व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत.
अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, अशी सूचना महापालिका प्रशासनाने दिली आहे.
