पिंपरीत ‘पवनेचा राजा पुरस्कार २०२६’; कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव

पिंपरीत ‘पवनेचा राजा पुरस्कार २०२६’; कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव

पिंपरी : पवना मित्र मंडळ, पिंपरी गावच्या वतीने सामाजिक, सांप्रदायिक, पत्रकारिता, क्रीडा, कामगार, शैक्षणिक, वैद्यकीय आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘पवनेचा राजा पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला. मंडळाच्या ५४ वर्षांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी परंपरेचा भाग म्हणून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

सांप्रदायिक क्षेत्रात ह.भ.प. सतीश ज्ञानोबा गव्हाणे, सामाजिक क्षेत्रात अशोक गणपत नाणेकर, पत्रकारिता क्षेत्रात दैनिक सकाळचे मिलिंद गोविंद भुजबळ, क्रीडा क्षेत्रात प्रथम मावळ केसरी पै. खंडू बबन वाळुंज, कामगार क्षेत्रात सेंच्युरी एन्काचे रमेश लक्ष्मण वाघेरे, शैक्षणिक क्षेत्रात संपत जगताप, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. संजय देवधर आणि उद्योग क्षेत्रात करण सिंघी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच नायब तहसीलदार विशाखा अविनाश बालकवडे आणि पोलीस उपनिरीक्षक अविनाश केदारी यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आळंदी ते पंढरपूर वारीदरम्यान वारकरी भाविकांना आरोग्यसेवा देणारे डॉ. देविदास शेलार यांचा सेवाभावी कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. तर चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय पांडुरंग जगताप यांच्या गोसेवा, वारकरी सेवा तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, कला-क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना ‘विशेष समाजसेवा गौरव सन्मानपत्र’ प्रदान करण्यात आले.

सोहळ्यास मंडळाचे अध्यक्ष विशाल विष्णुपंत वाघेरे, कार्याध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे, हनुमंत नेवाळे, प्रभाकर वाघेरे, ह.भ.प. आप्पा बागल, डब्बू असवाणी, दत्तोबा नाणेकर, अण्णा कापसे, मनीष पंजाबी, गणेश ढाकणे, महादेव वाळुंजकर, दीपिका कापसे, अनिता वाळुंजकर आणि शारदाताई मुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

समाजातील विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्याचा मानस मंडळाने व्यक्त केला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories