सोसायट्यांचा ओला कचरा पूर्ववत उचलला जाणार,  पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेने व्यक्त केले समाधान

सोसायट्यांचा ओला कचरा पूर्ववत उचलला जाणार, पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेने व्यक्त केले समाधान

सोसायट्यांचा ओला कचरा पूर्ववत उचलला जाणार,  पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेने व्यक्त केले समाधान 

पिंपरी, ता. १ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांचा ओला कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याबाबत विविध संघटनांना रहिवाशांच्या अडचणी महापालिका प्रशासनासमोर मांडल्या आणि अखेर महापालिकेने आपला निर्णय मागे घेत ओला कचरा पूर्ववत उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत,  पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे. 

याबाबत, संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,  पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेसह आणखी काही संघटनांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा, संघटनांच्या प्रशासनाशी झालेल्या बैठका, विविध अधिकाऱ्यांना दिलेली निवेदने आणि आंदोलनाचा दिलेला इशारा या सर्व घडामोडींमुळे महापालिकेने ओला कचरा न उचलण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. शहरातील अनेक सोसायट्यांकडे कंपोस्टिंग प्रकल्पासाठी आवश्यक जागा नसल्याने हा निर्णय व्यवहार्य नव्हता. 

आता महापालिका प्रशासनाने निर्णयात बदल करून सोसायट्यांचा ओला कचरा पूर्ववत उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत आहे.  महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या अडचणींचा सकारात्मक विचार केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.


याबाबत, बोलताना पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेचे अध्यक्ष सत्यब्रत त्रिपाठी म्हणाले, “महापालिकेने ओला कचरा उचलण्याच्या निर्णयात केलेला बदल हा पिंपरी-चिंचवडमधील हजारो हाऊसिंग सोसायट्या आणि लाखो नागरिकांच्या एकजुटीचा विजय आहे. आम्ही सुरुवातीपासूनच पर्यावरण संवर्धनाला विरोध केला नाही; मात्र व्यवहार्य अंमलबजावणीची मागणी केली. प्रशासनाने आमचे म्हणणे ऐकून सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करतो. भविष्यातही नागरिकांच्या हितासाठी संघटना अशाच पद्धतीने ठामपणे आवाज उठवत राहील.”




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories