दोन २४ वर्षीय युवकांकडून ४१ लाख ९८ हजार रुपयांचा गांजा जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

दोन २४ वर्षीय युवकांकडून ४१ लाख ९८ हजार रुपयांचा गांजा जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

दोन युवकांकडून ४१ लाख ९८ हजार रुपयांचा गांजा जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

पिंपरी, ता. १९ - पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन गांजा तस्करी करणाऱ्या आरोपींकडून एकूण ५७ लाख ७३ हजार ५१०/- किंमतीचा त्यामध्ये ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा, ३ मोबाईल, रोख रक्कम व एक स्कॉर्पिओ गाडी असा मुद्देमाल जप्त केला आहे. 

अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई सुरु आहे. गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना दिनांक १८ जूनला २०२६ सुमारास चाकण उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे चाकण येथे रुबी बेकरी जवळ (खंडोबा माळ) दोन आरोपींकडून गांजा, मोबाईल, स्कॉर्पिओ गाडी व रोख रक्कम असा एकूण ५७ लाख ७३ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ४१,९८,०००/- रुपये किंमतीचा ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, ७५,०००/- रूपये किंमतीचे ३ मोबाईल व ५१०/- रोख रक्कम तसेच १५,००,०००/- रूपये किंमतीची एक स्कॉर्पिओ गाडी असा मुद्देमाल समाविष्ट आहे. 

अटक आरोपींची नावे १) अनिकेत राजेंद्र बिरंगळ (वय २४ वर्षे, रा. खंडोबामाळ, चाकण, ता. खेड) व २) कुशल उध्दव पाठक (वय २४ वर्षे, रा. कोथरुड) अशी आहेत. आरोपींविरुद्ध चाकण उत्तर पोलिस ठाण्यात येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क) २० (ब) (ii) (क) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक रोहित दिवटे, पोलिस उपनिरीक्षत जिलाणी मोमीन, पोलिस हवालदार /१२२२ जावेद बागसिराज, पोहवा/२३६७ ज्ञानेश्वर मुळे, पोहवा/१५०७ किशोर परदेशी, पोहवा /१७०६ निखिल शेटे, पोहवा/१९१६ विजय दौंडकर, पोलिस शिपाई/२०९८ सदानंद रूद्राक्षे, पोशि २३८१ निखिल वर्षे, पोशि/२७१२ कपिलेश इगवे यांच्या पथकाने केली आहे. तांत्रिक विश्लेषणसाठी पोशि/२४३०/सुभाष गुरव, पोहवा / ३०६८ प्रकाश ननावरे यांनी मदत केली आहे.

आवाहन....

अंमली पदार्थाच्या संदर्भात कोणतीही माहीती मिळाल्यास त्यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक, पिंपरी-चिंचवड - ८६००००२३२०, पोलिस हेल्पलाईन - ११२, मानस हेल्पलाईन क्र. १९३३ [email protected] यावर संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना करण्यात येत आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories