पिंपरी-चिंचवड व लोणावळा एसटी स्थानकाला परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची भेट, सोयी-सुविधांचा घेतला आढावा
पिंपरी-चिंचवड व लोणावळा एसटी स्थानकाला परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची भेट, सोयी-सुविधांचा घेतला आढावा
पिंपरी, ता. ३० - महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी गुरुवारी (ता. ३०) वल्लभनगर- पिंपरी येथील बस स्थानकाला व लोणावळा बसस्थानकाला भेट देऊन स्थानकाची पाहणी केली. बस स्थानकाची सद्यस्थिती, प्रवासी सुविधा तसेच चालक व वाहकांना येणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा सरनाईक यांनी घेतला. तत्काळ आवश्यक त्या सुधारणा व उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
यावेळी, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेत्या नगरसेविका सुलभा उबाळे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पुणे बस विभाग नियंत्रण अधिकारी अरुण सिया, प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी आदित्य जाधव तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सरनाईक यांनी स्थानकाची सर्वत्र फिरुन पाहणी केली व स्थानकातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच प्रवाशांकडूनही सेवेबाबत जाणून घेतले. एसटी सेवा अधिक भक्कम व सोयीची करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ प्रयत्नशील आहे. त्यासाठीच सरनाईक यांनी पिंपरी-चिंचवड स्थानकाची व लोणावळा स्थानकाची पाहणी केली. यामुळे, येत्या काळात पिंपरी-चिंचवड व मावळातील एसटी बस स्थानके सुसज्ज पाहायला मिळतील अशी आशा आहे.
- Pimpri-Chinchwad, Lonavala, ST Station, Transport Minister, Prataprao sernaik visit
- पुणे बस विभाग, अरुण सिया, अमृता ताम्हणकर, पल्लवी पाटील, आदित्य जाधव, स्थानक पाहणी,
- स स्थानक, प्रवासी सुविधा, बस सेवा, सुधारणा, प्रशासन, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना, नगरसेविका सुलभा उबाळे,
- पिंपरी-चिंचवड, लोणावळा, एसटी स्थानक, परिवहन मंत्री, प्रतापराव सरनाईक