पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल, अतिरिक्त कार्यभाराचे वाटप
Jun 03 2026
11
पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल, अतिरिक्त कार्यभाराचे वाटप
पिंपरी, ता. ३ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल केले आहेत. अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या स्वाक्षरीने स्वतंत्र आदेश दिले आहेत. त्यानुसार संबधित अधिकाऱ्यांनी कार्यभार तातडीने घ्यावा, असे महापालिकेकडून दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आदेशानुसार, अभिलेख कक्षाच्या प्रशासन अधिकारी उमा दरवेश यांच्याकडे स्थानिक संस्था कर विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाचे प्रशासन अधिकारी गोरखनाथ लिमण यांच्याकडे 'ब' क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे.
याशिवाय सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक दत्ता सूर्यवंशी यांच्याकडे क्रीडा विभागाच्या प्रशासन अधिकारीपदाचा, तर स्थानिक संस्था कर विभागाच्या कार्यालय अधीक्षक सरिता मारणे यांच्याकडे 'फ' क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.
- अतिरिक्त आयुक्त, Additional Commissioner, विक्रांत बगाडे, Vikrant Bagade, प्रशासनिक आदेश, Administrative Order
- सामान्य प्रशासन विभाग, General Administration Department, अतिरिक्त आयुक्त, Additional Commissioner
- अतिरिक्त कार्यभार, Additional Charge, अधिकारी जबाबदारी बदल, Officer Responsibility Change
- पिंपरी-चिंचवड महापालिका, Pimpri Chinchwad Municipal Corporation, PCMC, अधिकारी बदल, Administrative Reshuffle,