news
clock
अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजातर्फे उपवर परिचय संमेलनाला मोठा प्रतिसाद

अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजातर्फे उपवर परिचय संमेलनाला मोठा प्रतिसाद

अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजातर्फे उपवर परिचय संमेलनाला मोठा प्रतिसाद 

पिंपरी, ता. २४ - अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजातर्फे आयोजित उपवर परिचय संमेलन शनिवारी (ता. २१) रोजी थेरगाव येथील स्व. शंकर आण्णा गावडे स्मृती कामगार भवन येथे पार पडले. संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक मनोज ब्राम्हणकर व राजेंद्र महालपुरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या संमेलनात वधू-वर तसेच त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून, सुमारे २७०० समाजबांधव त्यामध्ये ९८० उपवर व उपवधू उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे व भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे , नगरसेविका कुंदा भिसे, अनिता काटे, नगरसेवक माऊली जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन करताना पारंपरिक विवाह जुळवणी पद्धतींसोबत आधुनिक विचारांची सांगड घालण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी सुमारे ९५० परिचय पत्रकांचा समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनात प्रत्येक वधू-वराला स्वतःची ओळख करून देण्याची संधी देण्यात आली. यामुळे पालकांना व उपस्थितांना योग्य जोडीदार निवडण्यास मदत झाली. गुणोमिलनासाठी गुरुजींची व्यवस्था तसेच परस्पर संवादासाठी स्वतंत्र वेळ देण्यात आला होता.

संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन देव, उपाध्यक्ष योगेश मोराणकर, नितीन वाणी व सोपान पितृभक्त, सनी शिरोडे, तैलेश बामणकर, किशोर ब्राह्मणकर यांनी संयोजन केले. संमेलनाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले.  भामरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories