महिलेचा विश्वासघात करुन मोबाईल बॅंकींगद्वारे १ लाख ८ हजार रुपयांचा अपहार
Mar 25 2026
57
महिलेचा विश्वासघात करुन मोबाईल बॅंकींगद्वारे १ लाख ८ हजार रुपयांचा अपहार
पिंपरी, ता. २५ - स्वतःचा मोबाईल फोन एका महिलेने एका इसमाला विश्वासाने वापरण्यासाठी दिला होता. महिलेचा विश्वासघात करुन त्या इसमाने महिलेच्या मोबाईलमधील बँक अॅपचा वापर करून १ लाख ८ हजार ६९५ रुपये स्वतःकडे घेतले. ही घटना २१ नोव्हेंबर २०२५ ते आत्तापर्यंत घडली आहे. आरोपीविरोधात मंगळवारी (ता. २४) हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेली ५६ वर्षीय महिला मारुंजी (ता. मुळशी, जि. पुणे) येथील रहिवासी आहे. तिने गणेश विश्राम सोनवणे (रा. वाघाळी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याला विश्वासाने स्वतःचा मोबाईल वापरण्यासाठी दिला होता.
आरोपी गणेशने महिलेचा विश्वासघात करुन मोबाईलमधील बँक अॅपचा वापर केला व १,०८,६९५/- रुपये रक्कम स्वतःकडे ट्रान्सफर केली. आरोपीविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.