news
clock
पुणे महानगरपालिकेचा वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेला सादर

पुणे महानगरपालिकेचा वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेला सादर

पुणे महानगरपालिकेचा वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेला सादर 

पुणे, ता. २४ - पुणे महानगरपालिकेचा आर्थिक वर्ष २०२६-२७ चा १५ हजार ६६९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मंगळवारी (ता. २४)  सर्वसाधारण सभेला सादर केला. महापौर मंजूषा नागपुरे उपस्थित होत्या.

आयुक्त नवल किशोर राम यांच्या मूळ प्रस्तावित १३,९९५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीकडून  १,६७४ कोटी रुपयांची भर घातली आहे. या अर्थसंकल्पात विकासकामांसोबतच महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना आखल्या आहेत. पुणे महानगरपालिकेच्या ७५ शाळांमध्ये किशोरवयीन मुलींसाठी पिंक रुम केल्या जाणार आहेत. यामध्ये  किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच महिलांच्या नावे असलेल्या मिळकतींवर ५० टक्के कर सवलत देण्यात येणार आहे, या महिलांसाठी अधिक महत्त्वाच्या योजना आहेत. 

शहरातील सार्वजनिक ठिकाणी १०० नवीन स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बसमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटावर ५० टक्के सवलत देण्यात आली आहे, या योजनांद्वारेही नागरीकांची उत्तम सोय होणार आहे.

यंदाचा अर्थसंकल्प पुणे शहराच्या जलद विकासावर, मूलभूत सुविधा सुधारणेवर आणि नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवण्यावर केंद्रित असल्याचे श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. महापौर मंजूषा नागपुरे यांनीही या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. 

थोडक्यात - 

एकूण अर्थसंकल्प : १५,६६९ कोटी रुपये

मालमत्ता करातून अपेक्षित उत्पन्न : ३८८२ कोटी

कर्मचारी वेतनासाठी तरतूद : २७४८ कोटी

प्राथमिक शिक्षणासाठी : ७६२ कोटी

विकासकामांसाठी तरतूद : ६८३७ कोटी

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories