प्रभाग क्रमांक ८ मध्ये 'पीएमपी'च्या बससेवेचे उद्घाटन

प्रभाग क्रमांक ८ मध्ये 'पीएमपी'च्या बससेवेचे उद्घाटन

प्रभाग क्रमांक ८ मध्ये 'पीएमपी'च्या बससेवेचे उद्घाटन 

पिंपरी, ता. ३ ऑगस्ट २०२६ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील सेक्टर क्रमांक १२ च्या परिसरातील नागरिकांसाठी 'पीएमपीएमएल'च्या मार्ग क्रमांक ३४० या नवीन बससेवेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार हा मार्ग सुरू करण्यात आला आहे.

सेक्टर क्रमांक १२ आणि परिसराचा वाढता विस्तार, पीएम आवास योजना तसेच परिसरातील विविध सोसायट्या, शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक भागात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर नवीन बस मार्ग सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांची चांगली सोय झाली आहे.

या बससेवेमुळे सेक्टर क्रमांक १२, पीएम आवास योजना परिसरातील नागरिकांना आळंदी, चिखली, मोशी, निगडी तसेच शहरातील विविध भागांमध्ये ये-जा करण्यासाठी अधिक सुलभ आणि सोयीस्कर सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories