पीएमआरडीए' कार्यालयात स्वतंत्र ‘आवक-जावक कक्ष ’सुरू
पिंपरी, ता. २३ - पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी मुख्य कार्यालयात बांधकाम विकास परवानगी विभागासाठी स्वतंत्र ‘आवक-जावक कक्ष (Inward-Outward Cell)’ सुरू करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे आता कागदपत्रांची तपासणी, फाइल्सची जलद हालचाल, तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रतीक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बांधकाम परवनागीची प्रक्रिया अधिक अधिक पारदर्शक, गतिमान व कार्यक्षम बनवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या कक्षामध्ये, कागदपत्रांतील त्रुटींची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे, फाइल्स प्रलंबित राहण्यावर आळा बसणार आहे, सहाय्यक नगर रचनाकारांचे मार्गदर्शन लाभणार आहे, आर्किटेक्ट व विकासकांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालय असणार आहे, असे 'पीएमआरडीए'ने म्हटले आहे.

- Document Verification, फाइल हालचाल, File Movement, पारदर्शकता, Transparency, गतिमान प्रक्रिया, Fast Process,
- विकास परवानगी विभाग, Development Permission Department, कागदपत्र तपासणी
- आवक-जावक कक्ष, Inward-Outward Cell, बांधकाम परवानगी, Building Permission
- पीएमआरडीए, PMRDA, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, Pune Metropolitan Region Development Authority