पुढील एक ते दीड वर्षांत रचनात्मक आराखडा, तयार करून लागू करावा,  नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश

पुढील एक ते दीड वर्षांत रचनात्मक आराखडा, तयार करून लागू करावा, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश

पुढील एक ते दीड वर्षांत रचनात्मक आराखडा, तयार करून लागू करावा,  नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश

'पीएमआरडीए'च्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची आढावा बैठक

पिंपरी, ता.‌ १८ - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील विकास आराखडा (डीपी) रद्द झाल्यामुळे रखडलेल्या परवानग्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील एक ते दीड वर्षांत रचनात्मक आराखडा (स्ट्रक्चरल प्लॅन) तयार करून लागू करावा, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

पीएमआरडीएच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध नगररचना योजना, रिंग रोड आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पीएमआरडीएच्या आकुर्डी मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुधवारी (१७ जून) ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. याप्रसंगी महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी उपस्थित होत्या.

बैठकीत बोलताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, "मंजूर नगररचना योजनांपैकी पाच योजना पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित १५ प्रस्तावित नगररचना योजनांबाबत जलद गतीने निर्णय घेण्यासाठी मंत्रालय स्तरावर आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला जाईल. पीएमआरडीएच्या अंतर्गत ‘इनर रिंग रोड’चे भवितव्य या नगररचना योजनांवरच अवलंबून असल्याने या योजनांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. "

राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘पाताळलोक’ (ट्विन टनेल) प्रकल्पासाठी विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) सुरु करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. याचबरोबर पुणे महानगरपालिकेने प्रस्तावित केलेला ‘एचसीएमटीआर’ (उच्चक्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग) प्रकल्प, पीएमआरडीएमार्फत प्रस्तावित रिंग रोड आणि ट्विन टनेल प्रकल्प यांसंदर्भात संयुक्त बैठक आयोजित करून चर्चा करण्याची सूचनाही त्यांनी केली.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories