रावेत येथील स्पा सेंटर मालकाला मागितली ५० हजारांची खंडणी

रावेत येथील स्पा सेंटर मालकाला मागितली ५० हजारांची खंडणी

रावेत येथील स्पा सेंटर मालकाला मागितली ५० हजारांची खंडणी 

पिंपरी, ता. १८ - रावेत परिसरातील एका स्पा व मसाज सेंटरमध्ये परवानगीशिवाय प्रवेश करुन तेथील व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत स्पा सेंटर मालकाकडून ५०‌ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी आरोपींवर रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी दिपक ज्योतीराम कोल्हापुरकर (वय ३८, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) यांच्या तक्रारीनुसार, २३ मे ते १६ जून २०२६ या कालावधीत आरोपींनी मस्के वस्ती, रावेत येथील “कोनया स्पा” येथे परवानगीशिवाय प्रवेश करून स्पा व मसाज सेंटरचे व्हिडिओ काढले. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीकडे ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

आरोपींनी सुरुवातीला ५ हजार रुपये रोख स्वरूपात स्वीकारल्याचा आरोप असून, उर्वरित ४५ हजार रुपयांची वारंवार मागणी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच एका ग्राहकाकडूनही ५,५०० रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात स्वाती गायकवाड, विष्णु सुरवसे (रा. हडपसर) व इतर दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक झालेली नाही.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories