मालमत्ता करावरील ५ ते ५० टक्क्यांपर्यंतच्या सवलतींचा लाभ घेण्याची अखेरची संधी !

मालमत्ता करावरील ५ ते ५० टक्क्यांपर्यंतच्या सवलतींचा लाभ घेण्याची अखेरची संधी !

मालमत्ता करावरील ५ ते ५० टक्क्यांपर्यंतच्या सवलतींचा लाभ घेण्याची अखेरची संधी !

विविध कर सवलतींचा लाभ ३० जूनपर्यंतच घेता येणार !

पिंपरी, ता. २४ - मालमत्ता करावरील आकर्षक सवलतींचा लाभ घेण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांकडे आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून वेळेत कर भरणाऱ्या, ऑनलाइन मालमत्ता कर, महिला मालमत्ताधारक, दिव्यांग व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या संस्था आणि आस्थापनांसाठी ५ ते ५० टक्क्यांपर्यंतच्या विविध सवलती देण्यात येत आहेत. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम तारीख असून त्यानंतर पूर्ण कर भरावा लागणार आहे.

महानगरपालिकेने वेळेत कर भरणाऱ्या, ऑनलाइन मालमत्ता कर, महिलांच्या नावावर मालमत्ता असलेल्या तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या नागरिकांसाठी आणि संस्थांसाठी विशेष सवलती लागू केल्या आहेत. अनेक मालमत्ताधारकांनी या सवलतींचा लाभ घेतला आहे. तसेच अनेक मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही. अशा मालमत्ताधारकांना ३० जून २०२६पूर्वी मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घ्या, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, ३० जूनपूर्वी कर भरल्यास मिळणारी ५ टक्के सवलत आणि ऑनलाइन कर भरण्यासाठी मिळणारी अतिरिक्त ५ टक्के सवलत यामुळे पात्र मालमत्ताधारकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच महिलांच्या नावावरील निवासी मालमत्तांसाठी ३० टक्के, दिव्यांग व्यक्तींसाठी ५० टक्के आणि स्वातंत्र्यसैनिक, विधवा पत्नी यांना मालमत्ता करात सवलत देण्यात आली आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या गृहनिर्माण संस्था आणि आस्थापनांनाही विविध सवलती दिल्या जात आहेत. कंपोस्टिंग प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP), झिरो वेस्ट संकल्पना तसेच ग्रीन बिल्डिंग उपक्रम राबविणाऱ्या संस्थांना ३ टक्क्यांपासून १५ टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ मिळू शकतो.

मालमत्ता करातून मिळणारा निधी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, उद्याने आणि विविध नागरी विकासकामांसाठी वापरला जातो. त्यामुळे नागरिकांनी सवलतींचा लाभ घेत वेळेत कर भरून शहर विकासात सहभाग नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून करण्यात आले आहे.

सामान्य करावरील प्रमुख सवलती:

* ३० जूनपूर्वी कर भरल्यास – ५ टक्के सवलत

* ऑनलाइन कर भरल्यास – ५ टक्के अतिरिक्त सवलत

* महिलांच्या नावावरील एका निवासी मालमत्तेस – ३० टक्के सवलत

* दिव्यांग व्यक्तीच्या नावावरील एका मालमत्तेस – ५० टक्के सवलत

* स्वातंत्र्यसैनिक, सैनिक विधवा पत्नीस एका निवासी मालमत्ता करावर सवलत.

अथवा त्यांच्या पत्नींच्या एका निवासी मालमत्तेस – ५० टक्के सवलत

* ऑनसाइट कंपोस्टिंग – ५ टक्के सवलत

* एसटीपी प्लांट – ३ टक्के सवलत

* कंपोस्टिंग व एसटीपी दोन्ही – ८ टक्के सवलत

* झिरो वेस्ट प्रकल्प – ८ टक्के सवलत

* झिरो वेस्ट व एसटीपी – १० टक्के सवलत

* ग्रीन बिल्डिंग – ५ ते १५ टक्क्यांपर्यंत सवलत

सवलतींचा लाभ घेण्यासाठी ३० जून २०२६ हीच अंतिम तारीख आहे.


३० जून २०२६ पूर्वी कर भरावा...

''पिंपरी चिंचवड हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि इतर नागरी सुविधांचा विस्तार करण्यासाठी महापालिकेला सक्षम आर्थिक पाठबळ आवश्यक असते. नागरिकांनी भरलेला मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा महत्त्वाचा आधार आहे. महापालिकेने दिलेल्या विविध सवलतींचा लाभ घेत ३० जून २०२६ पूर्वी कर भरावा आणि आपल्या शहराच्या विकासात थेट सहभाग नोंदवावा.''

- रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


''महानगरपालिकेने दिलेल्या विविध सवलतींचा लाभ घेत शहरातील लाखो मालमत्ताधारकांनी वेळेत मालमत्ता कर भरला असून त्यांना आर्थिक लाभही मिळाला आहे. मात्र, अद्याप अनेक मालमत्ताधारकांकडे कराची थकबाकी आहे. उपलब्ध सवलतींचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांनी ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरावा. नागरिकांच्या कररूपाने मिळणाऱ्या महसुलातूनच शहरातील विकासकामे आणि नागरी सुविधा अधिक सक्षमपणे राबविता येतात.''

- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


''मालमत्ता करावरील विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर १ जुलैपासून थकीत कर वसुलीसाठी नियमानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये नोटिसा, जप्ती तसेच इतर कायदेशीर उपाययोजनांचा समावेश असू शकतो. त्यामुळे नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी आणि उपलब्ध सवलतींचा लाभ घेण्यासाठी मुदतीपूर्वी मालमत्ता कर भरावा.''

- सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका







Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories