पुणे ते पंढरपूर सायकल वारी उपक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या टी-शर्ट जर्सीचे अनावरण
पुणे ते पंढरपूर सायकल वारी उपक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या टी-शर्ट जर्सीचे अनावरण
पुणे, ता. १५ - महानगरपालिकेचे सेवक व कर्मचारी यांच्या पुणे ते पंढरपूर सायकल वारी या प्रेरणादायी उपक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या टी-शर्ट जर्सीचे अनावरण करण्यात सोमवारी (ता. १५) महानगरपालिका प्रांगणामध्ये आले. तसेच सहभागी कर्मचाऱ्यांना यशस्वी, सुरक्षित व उत्साहपूर्ण वारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मा. महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षनेते सोपान चव्हाण, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, . अतिरिक्त आयुक्त (इ) प्रजीत नायर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त माधव जगताप, प्र. मुख्य अभियंता(प्रकल्प विभाग) गोजारे, पाणी पुरवठा अधिकारी जगताप, बनकर तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.