news
clock
पुणे रेल्वे स्थानकामध्ये विकसित होणार सहा नवीन 'प्लटफॉर्म'

पुणे रेल्वे स्थानकामध्ये विकसित होणार सहा नवीन 'प्लटफॉर्म'

पुणे रेल्वे स्थानकामध्ये विकसित होणार सहा नवीन 'प्लटफॉर्म'

पुणे, ता. ४ - पुणे रेल्वे स्थानकामध्ये मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये सहा नवीन प्लटफॉर्म होणार आहेत. या प्लटफॉर्मवर येण्यासाठी प्रवाशांना येण्यासाठी जुना मालधक्का येथून प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे. सध्या असलेले फलाट व नवीन फलाट यांना जोडण्यासाठी पादचारी उड्डाण पूल (स्कायवॉक) बांधला जाणार असून, पार्सलच्या वाहतुकीसाठी भुयारी मार्ग (सब वे) असणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

प्लटफॉर्म, स्कायवॉक व सब-वे या याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून, हे काम दीड वर्षात काम संपणार आहे. यासाठी सुमारे ४०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये नवीन प्लॅटफॉर्म केले जाणार आहेत. यात ७५० मीटर लांबीचे नवीन ६  प्लॅटफॉर्म बांधले जातील. जुन्या मालधक्क्याच्या जवळ असलेल्या जीएल (गुड्स लूप) लाइनच्या जागेत नवीन  प्लॅटफॉर्म बांधले जातील. तसेच यावेळी पुणे स्थानकावरचे ज्या प्लॅटफॉर्म लांबी कमी आहे. त्याचाही विस्तार केला जाणार आहे.

नवीन प्लटफॉर्मवर येण्यासाठी प्रवाशांना येण्यासाठी जुना मालधक्का येथून प्रवाशांना प्रवेश दिला जाणार असून हे स्थानकाचे तिसरे प्रवेशद्वार असेल. 

पुणे रेल्वेस्थानकाची क्षमता वाढवताना भविष्यात येथून धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढणार आहे. पुणे ते लोणावळा दरम्यानदेखील तिसरी व चौथी मार्गिका भविष्यात टाकण्यात येणार आहे.  फलाटांची लांबी व संख्या वाढल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

याबाबत बोलताना रेल्वेचे पुणे विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा म्हणाले की, ''जुन्या मालधक्क्याच्या जागेत नवीन प्लॅटफॉर्म काम होणार आहे. स्थानकाचे यार्ड रिमॉडेलिंगचे काम होणार आहे. टप्प्या-टप्प्याने हे काम केले जाईल. नव्या फलाटामुळे प्रवाशांची मोठी सोय होईल.''




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories