news
clock
पुणे ट्रॅफिक पोलिस अॅप्लिकेशनला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तक्रारी नोंदवणाऱ्या नागरीकांचा सन्मान

पुणे ट्रॅफिक पोलिस अॅप्लिकेशनला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तक्रारी नोंदवणाऱ्या नागरीकांचा सन्मान

पुणे ट्रॅफिक पोलिस अॅप्लिकेशनला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तक्रारी नोंदवणाऱ्या नागरीकांचा सन्मान

पुणे, ता. २५  - पुणे पोलिसांनी सुरु केलेल्या पुणे ट्रॅफिक पोलिस अॅपद्वारे आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत आणि सुमारे ९ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे शहर वाहतूक शाखेने दिली. 

पुणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने सोमवारी (ता. २३) 'पीटीपी' अॅपद्वारे  फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक तक्रारी नोंदवणाऱ्या नागरीकांचा सत्कार पोलिस आयुक्तालयात करण्यात आला. विजेत्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. 

 प्रथम क्रमांकाला ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २५ हजार रुपये, तृतीय क्रमांकास १५ हजार रुपये व , चतुर्थ क्रमांकास १० हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकास पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. अॅपवर प्राप्त झालेल्या तक्रारींवर प्रभावी कारवाई करणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. या वेळी पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव उपस्थित होते.

वाहतूक शाखेच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे एक लाख ५५ हजारांहून अधिक नागरिकांनी 'पीटीपी' अॅपचा वापर केला आहे. या अॅपद्वारे दोन लाख ४९ हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची पडताळणी करून एक लाख ७६ हजारांपेक्षा अधिक प्रकरणांमध्ये सुमारे नउ कोटी ३२ लाख ८२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे महापालिका आणि शहर पोलिस यांच्या वतीने 'होर्डिंगमुक्त पुणे' अभियान हाती घेण्यात आले आहे. विशेष मोहीम राबवून अनधिकृत होर्डिंग, रस्त्यावरील बेवारस वाहने हटविण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनी 'पीटीपी' अॅपचा वापर करून वाहतूक नियमभंग, बेकायदेशीर होर्डिंग, पार्किंग आणि अडथळे निर्माण करणाऱ्या बाबींची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories